भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे गायत्री उरकुडे यांचा सत्कार #ballarpur


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
बल्लारपूर:- यंग इन्स्पिरेशन नेटवर्कच्या सभापती पदी संपूर्ण महाराष्ट्रातून चंद्रपूर जिल्ह्यातील गायत्री उरकुडे यांची निवड झाल्याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार सेवाकेंद्र तथा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा कार्यालयात गायत्री उरकुडे यांचा भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या हस्ते शॉल,पुष्पगुच्छ व सिंहावलोकन पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आला व भविष्यात युवकांच्या - युवतींच्या प्रश्नाला सोडवण्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे कार्य आपल्या हातून व्हावे असे प्रतिपादन आशिष देवतळे यांनी केले व उज्ज्वल भविष्याच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजणे,मोहित डंगोरे तसेच गुलशन शर्मा, माजी शिक्षक उरकुडे गुरुजी, प्रकाश दोतपेल्ली, राजेश कैथवास, रिंकू गुप्ता व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत