Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

थ्रेशर मशिनमध्ये तुरी टाकताना गेला तोल #death

युवकाच्या कमरेखालच्या भागाचा चेंदामेंदा
बुलढाणा:- मलकापूर तालुक्यातील भालेगाव रणगाव शिवारात ही घटना घडली. पवन श्रीराम बावस्कर हा 20 वर्षीय मजुरीसाठी गेला.
तुरी मशीममध्ये टाकण्याचे काम सुरू होते. मशीनवरचे काम करत असताना संपूर्ण तुरी काढून झाल्या. त्यानंतर शेवटच्या वेळी त्याचा मशीनमध्ये अचानक पाय गेला. मशीनमध्ये पाय जाताच तो अतिशय गंभीर जखमी झाला. त्याचे पाय निकामी झाले. कमरेखालचा भाग चेंदामेंदा झाला. तिथून बाहेर काढून त्याला मलकापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही बातमी समजताच भालेगाव रणगावमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत