वर्धा नदी पात्रातून रेती चोरीच्या विनानंबरच्या दोन टॅक्टरवर कारवाई #action

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- येथील मुख्यालयापासून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या चुनाळ्याच्या वर्धा नदी घाट पात्रातून बेकायदेशीर रेती चोरी सुरू झाली असून याकरीता तस्करांनी घाटातून रस्ता तयार केला आहे. दरम्यान रेती उत्खननाच्या दुसऱ्याच दिवशी महसूल विभागाने विनानंबर च्या दोन टॅक्टर पकडून कारवाईचा 'श्रीगणेशा' करीत तस्करांना चांगलाच दणका दिला आहे.
सध्या रेती तस्करांना सुगीचे दिवस आले आहे. याच रेतीवर तस्करांची वाकडी नजर पडली आहे.. तसेच चुनाळा, सातरी, कोहपरा वर्धा नदी घाटाचे पात्र देखील तस्करांसाठी वरदान ठरत आहे.या नदी, नाल्यातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू असतांना सुध्दा याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने तस्करांचे चांगलेच फावत आहे असा आरोप होत आहे.
 
        दरम्यान दोन दिवसाअगोदर चुनाळ्याच्या वर्धा नदी पात्रातुन रेती चोरीचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. याची माहिती मिळाल्यावरून मंडळ अधिकारी निरांजन गोरे व सुभाष साळवे, एम बी अत्रे, तलाठी विल्सन नांदेकर  यानी पात्रात धडक दिली व दोन टॅक्टरमधून रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याचे दिसताच कारवाई केली आहे. या दोन्हीही टॅक्टर विनानंबर च्या आहे.
       
     यावेळी ट्रॅक्टर चालकाने मुजोरी केली व ट्रॅक्टर सोडून गेलेत व हुज्जत घालीत शासकीय कामात अळथळा आणला यावरून वाहन मालक सचिन आसुटकर, अस्लम चाऊस सह इतर विरुद्ध गुन्हा दाखल केला असून राजुरा पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कारवाईने तस्करांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.