Click Here...👇👇👇

प्रभाग 1 मधील फिल्टर आरो वर लक्ष कुणाचे? #Korpana

Bhairav Diwase
1 minute read

सामान्य नागरिकांनच्या समस्या संपणार कधी?
कोरपना:- प्रभाग क्रमांक 1 मधील फिल्टर आरो दोन दिवसांपासून बंद आहेत यात पाण्याविना नागरिकांचे हाल झाले आहे. या फिल्टर आरो वर कोणत्याच लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही आता उन्हाळा समोर येत आहे.
जनतेला येथील पाण्याची सवय लावून आतापावेतो थंड पाण्याची मशीन सुद्धा लावलेले नाही आरो बंद असल्यामुळे जनतेचा आक्रोश पाहायला मिळत आहे नगराध्यक्षांना विचारणा केली असता त्या फिल्टर वर काम करणाऱ्या मुलांसोबत बोलून सांगू पण टाईम लागेल अशी माहिती मिळते पण जनता जाणार कुणाकडे मागील एक वर्षापासून येथे अरो लावला आहेत पण आता पावेतो थंड पाण्याची मशीन लावली नाही लोकप्रतिनिधी मात्र निवड आश्वासन देऊन वेळ मारून नेत आहे. येथील काम करणारा मुलगा गैरहजर असतो अशी जनतेची प्रतिक्रिया मिळत आहेत. कुणाला सांगायचं असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे.
नियमित काम करणारा नवीन मुलगा ठेवावा अशी जनतेची प्रतिक्रिया आहे यात नगर नगराध्यक्षा आणि सभापती पण जवळच असून सुद्धा यावर त्यांचे लक्ष नाही एम ई सी बी नि या फिल्टर ची लाईन कट केली आहे अशी माहिती स्थानिक रहिवस्यानी दिली बिल भरायला एवढा उशीर का जनतेने पाणी कुठून भरायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे. या प्रभागातील नगरसेवक अध्यक्ष बोलायला तयार नाहीत मागील दीड वर्षापासून हा प्लाट तयार झाला आहे. पण यात थंड पाण्याची मशीन सुद्धा नाही पण साधे पाणीसुद्धा प्यायला लोकांना मिळेल की नाही हा प्रश्न त्यांना पडला आहे .यामुळे येथील जनतेला कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न त्यांना पडला आहे. आता तरी या फिल्टर आरोपी नियमित चालू ठेवावा अशी मागणी नागरिकांन कडून होत आहे.