Top News

शेतकऱ्यांनी राज्यमार्ग अडविला; 50 वर्षापासून जमिनीचा मोबदला नाही #gondpipari


गोंडपिपरी:- शासकीय काम लांबच लांब अस म्हटलं जातं,ते काही खोटं नाही.याचा अनुभव चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आला.एक नाही दोन नाही तब्बल पन्नास वर्षापासून 11 शेतकऱ्यांना मार्गात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला.आता मात्र शेतकऱ्यांनी कठोर भुमिका घेत नव्याने सूरू असलेलं मार्गाचे काम बंद पाडले.
सन 1972 वर्षापुर्वी धाबा-पोडसा या मार्गाचा कामाला सूरवात झाली.मार्गालगत असलेल्या शेतजमीनी मार्गात गेल्या. जमिनीचा मोबदला देऊ असं प्रशासनानं सांगितलं. मात्र पन्नास वर्ष उलटले तरी मोबदल्याचा नावावर शेतकर्यांचे हात रीतेच आहे.जमिनीचा मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयात चकरा मारल्यात.
आमदार,खासदार मंत्र्यांना निवेदन दिलीत.मात्र फाईलवर साचलेली साधी धूळही उडालेली नाही.आता नव्याने धाबा-पोडसा या मार्गाचे बांधकाम सूरू झाले.जमिनीचा मोबदला द्या ,मगच कामाला सूरवात करा,अशी कठोर भुमिका शेतकर्यांनी घेतली.मार्गाचे काम बंद पाडले.जो पर्यत मोबदला मिळणार नाही,तो पर्यत काम करू देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने