जाहिरात... Advertisement... विज्ञापन

अज्ञात वाहनाच्या धडकेत गुराखी ठार #accident

वरोरा:- आपल्या मालकांची गुरे चराईसाठी नेत असतांना अज्ञात वाहनाची धडक बसली. सदर अपघातात गुराखी जागीच ठार झाला. मृतक गुराख्याचे नाव कवडू शंकर मांडवकर वय 60 वर्ष,रा.एकार्जुना,ता.वरोरा येथील आहे. चंद्रपूर नागपूर महामार्गावर 4 फेब्रुवारी 2022 ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली.
मृतक कवडू शंकर मांडवकर हा डॉ. चांडक यांचेकडे त्यांचे गुरे चारण्यासाठी गुराखी म्हणून नोकर होता. नेहमीप्रमाणे गुरे चारण्याची वेळेत गुरे घेऊन मृतक महामार्गावरून निघाला. परंतु एका अज्ञात वाहनाने वृद्ध मृतक गुराख्याला जबर धडक दिली. आणि त्यामध्ये मृतक जागीच ठार झाला.
घटनेची माहिती होताच घटना स्थळी पोलीस पोहचून घटना स्थळ पंचनामा करून  .शव उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेण्यात आले.येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करुन शविच्छेदन केलं. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक बेलसरे यांनी अज्ञात वाहनांचा शोध लावण्याचे दृष्टीने शोध मोहीम सुरू केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत