जाहिरात... Advertisement... विज्ञापन

मंत्री नवाब मलिकांच्या निषेधार्थ भाजपाचे चंद्रपूरात निदर्शने आंदोलन #chandrapur

नवाब मलिकांच्या राजिनाम्याची केली मागणी
चंद्रपूर:- १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या गुन्हेगारांशी ठेवलेल्या आर्थिक व्यवहारावरून ईडीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची काल चौकशी करून अटक केली. त्यामुळे त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी अद्यापही राजीनामा दिला नाही.
याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा व महानगराच्या वतीने चंद्रपूरातील जटपुरा गेट येथील गांधी पुतळ्यासमोर निदर्शनं देत आंदोलन करण्यात आले. याठिकाणी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन निषेध नोंदविला. आणि यांच्या राजिनाम्याची मागणी करण्यात आली.

यावेळी बोलताना, देशद्रोह्यांसोबत मनीलॉन्ड्रिंगसारखे व्यवहार ठेवणे, हे राज्य व राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक असून मालिकांचे असे कृत्य म्हणजे राष्ट्रविरोधी शक्तींना मदत करण्यासारखे आहे.
ज्या दाऊद इब्राहिमने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले, वेळोवेळी विघातक कृत्यांना चालना दिली, त्या व्यक्तीशी कुठलेही आर्थिक व्यवहार म्हणजे देशद्रोह असून अशा व्यक्तीस मंत्रिपदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे नवाब मलिकांची राज्यमंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा. असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.

यावेळी, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष जेष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी आमदार सुदर्शन निमकर, जि. प. अध्यक्ष संध्याताई गुरनुले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, महामंत्री नामदेव डाहुले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम, महानगर महामंत्री राजेंद्र गांधी, माजी महापौर अंजलीताई घोटेकर, जि. प. सभापती सुनिल उरकुडे, महानगर महामंत्री सुभाष कासगोट्टूवार, महामंत्री रवींद्र गुरनुले, चंदु मारगोणवार, उत्तर भारतीय मोर्चाचे रुद्रनारायण तिवारी, भाजयुमो महानगराध्यक्ष विशाल निंबाळकर, हनुमान काकडे, ओबिसी मोर्चाचे अविनाश पाल, विजय वानखेडे, नगरसेविका सौ. शिलाताई चव्हाण, सौ. प्रभाताई गुडधे, सौ. रेणूताई घोडेस्वार, सौ. किरणताई बुटले, सौ. मंजुश्रीताई कासनगोट्टूवार, सौ. प्रज्ञाताई बोरगमवार, मायाताई मांदाळे, सौ. भारतीताई दुधानी, सोपान वायकर, नगरसेवक रवी आसवानी, मिथिलेश पांडे, मुन्ना ठाकुर, महेंद्र मंडलेचा, अरुण रहांगडाले, दीपक भट्टाचार्य, नगरसेवक सौ. मायाताई उईके, गणेश रासपायले, व किसान मोर्चाचे राजू घरोटे, नगरसेविका सौ. शीतलताई आत्राम, नगरसेविका सौ. पुष्पाताई उराडे, विठ्ठल डुकरे, राजेश थुल, मोहम्मद जीलानी, रामकुमार आकपेल्लीवार, दिवाकर पुद्दटवार, गणेश रामगुंडेवार, सतीश तायडे, संजय पटले, मोनिषा महातव, चंदन पाल, आकाश ठुसे, रामणारायन रविदास, आनंदराव मांदाळे, लक्ष्मण कोडापे, राहुल पाल, प्रवीण उरकुडे, वैभव पिंपळशेंडे यांसह जिल्ह्यातून व महानगरातून मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत