जाहिरात... Advertisement... विज्ञापन

मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार "सिद्धार्थ चांदेकर" ताडोबात #tadoba #tadobanews

चंद्रपूर:- मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार सिद्धार्थ चांदेकर काल दुपारच्या सुमारास पत्नी व मुलगी असे आपल्या कुटूंबासहित ताडोबातील खडसंगी जवळील झरणा रिसोर्ट मध्ये तीन दिवसांच्या ताडोबा भ्रमंतीकरिता मुक्कामी असल्याची माहिती आहे.
ताडोबात देश विदेशातील पर्यटक वाघाला पाहण्यासाठी येत असून, या ताडोबात देश विदेशासहित चित्रपट सृष्टीतील कलाकार, क्रिकेटर, राजकीय क्षेत्रातील मंत्री, यासह अनेक नामवंत या ताडोबात वाघ पाहण्यासाठी येऊन गेलेले आहेत. ताडोबातील वाघांनी एखादी झलक जर दिली तर त्याचे छायाचित्र काढून, फेसबुक, ट्विटर अनेक सोशल मिडियात व्हायरल करून दाखविले जाते. त्यामुळं ताडोबात येण्यासाठी अनेकांचे पाऊल पुढे पडते. ताडोबातील वाघांनी एक झलक जरी दिली तर एकदा ताडोबात आलेल्या व्यक्तीला दुसऱयांदा सुद्धा ताडोबात येण्याची भुरळ पडत असते.
यातच काल दुपारच्या सुमारास मराठी चित्रपट सिनेअभिनेता सिद्धार्थ चांदेकर ताडोबात दाखल झाले. आल्याआल्याचं अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी आपल्या पत्नी व मुलीसह नवेगाव (रामदेगी) गेट मधून ताडोबातील बफर झोन मधून ताडोबा भ्रमंतीसाठी गेले होते. तेव्हा त्यांना आल्याआल्याच ताडोबा भ्रमंतीसाठी गेले असल्याने भानुसखिंडी नावाच्या वाघिणीचे दर्शन झाले असल्याची माहिती आहे.
आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान ताडोबातील कोअर झोन मधून प्रवेश केले मात्र आज सकाळी त्यांना ताडोबातील कोअर झोन मध्ये वाघाची कोणतीही सायडिंग झालेली नव्हती त्यामुळं आज सायंकाळी अजून ताडोबातील कोअर झोन मधून कुटूंबासाहित सफारी केली तेव्हा रुद्रा नावाच्या वाघाचे दर्शन झाल्याचे माहिती आहे
          सिद्धार्थ चांदेकर एक अभिनेता आहे. त्यांचा जन्म १४ जून १९९१  पुणे, महाराष्ट्रात. तो मराठी तसेच हिंदी चित्रपटांत काम करण्यासाठी ओळखले जातात. सिद्धार्थने टीव्ही मालिकांमध्ये दोन्ही भाषांमध्येही काम केले आहे. वयाच्या १९ व्या वर्षी ‘झेंडा’ या मराठी चित्रपटापासून त्याने आपल्या अभिनयाची सुरूवात केली. सिद्धार्थचा पहिला हिंदी चित्रपट म्हणजे ‘हमने जीना सिख लिया सिद्धार्थ चांदेकर यांची पहिली दूरदर्शन मालिका २००८ मध्ये होती, त्यांनी नील अग्निहोत्री म्हणून ‘अग्निहोत्री’ मूवी मध्ये काम केले आहे. २०१९ मध्ये हॉटस्टारवर प्रसारित झालेल्या ‘मायनागरी सिटी ऑफ ड्रीम्स’ मध्ये सिद्धार्थने देखील अभिनय केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत