टिप्परच्या धडकेत सीआयएसएफ (CISF) जवानाचा मृत्यू #death #CISF

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या सीआयएसएफ जवानाचा टिप्परच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर-नागपूर रोडवरील उर्जानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. कैलास नारायण कापरे असे मृत जवानाचे नाव आहे.
कैलास कापरे हे मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगावचे रहिवासी आहेत. मागील काही वर्षांपासून ते औष्णिक विद्युत केंद्रात सीआयएसएफ जवान म्हणून कार्यरत होते.
मंगळवारी सायंकाळी ते आपल्या दुचाकीने लखमापुरकडे जात होते. दरम्यान त्यांच्या मागून भरधाव येणाऱ्या टिप्पर क्रमांक एमएच ३४ एम ४१६२ ने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत