Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

भाजयुमो मध्य बाजार मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार तर्फे गरजूंना ब्लॅंकेट वाटप #chandrapur

चंद्रपूर:- सध्या सुरू असलेल्या हिवाळ्याचा दिवसात मागील काही दिवसांपासून शहरात तसेच इतर भागात थँडी चा कडकडात सुरू आहेत. आपला परिसर आपली जबाबदारी या हेतूने कार्य करणारे भाजयुमो मध्य बाजार अध्यक्ष गणेश रामगुंडेवार यांचा तर्फे दादमहाल वॉर्ड येथील परिसरातील वीस पेक्षा अधिक गरजूंना ब्लॅंकेट वाटप करून सेवाकार्य करण्यात आले.
कडाक्याची थंडी मध्ये परिसरातील बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.समाजातील गरीब व गरजूंना मदतीचा हात देणे हे माझे कर्तव्य आहे.त्यातून बांधिलकी जपली जाऊन सामाजिक सलोखा वाढीस लागेल.ही भूमिका मनामध्ये ठेऊन गणेशभाऊ रामगुंडेवार च्या नेतृत्वात नेहमी विविध परिसर-शहर येथे सेवाभावी कार्य होत असे.बांधवांची थोड्या का प्रमाणात होइना थंडीची चिंता मिटल्याने परिसरातील गरजु कुटुंबानी गणेश भाऊ चे आभार मानले व समाधान व्यक्त केले.

या सेवाभावी प्रसंगी मोहन मंचलवार,आशिष अलचावार, रमेश कोंडबतूनवार, संदिप रत्नपारखी, मयुर चौधरी, विपीन येंगलवार यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत