Top News

एस.टी. कर्मचाऱ्यांना धान्याचे किट वाटप #warora

भाजपाव्दारे एक स्तुत्य उपक्रम
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
वरोरा:- राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांचे मागील २६ ऑक्टोंबरपासून राज्यव्यापी संप सुरू आहे. परंतू मविआ सरकारकडून या संपाकडे व कामगारांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.
राज्य सरकारच्या अशा मनमर्जीमुळे एसटीच्या कामगार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वरोरा, राजुरा, ब्रह्मपुरी, गडचिरोली व अहेरी आगारातील कामगार बंधूभगिनींना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वितरण करण्यात येत आहे. यानिमित्तानं वरोरा आगारातील कामगारांना जिवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वितरण भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी स्वरतपस्विनी भारतरत्न स्व. लतादीदी मंगेशकर यांना मौण श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी, माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, तालुका महामंत्री ओम मांडवकर, शहराध्यक्ष सुरेश महाजन, जेष्ठ नेते बाबासाहेब भागडे, माजी पं. स. सभापती रोहिणीताई देवतळे, भाजयुमोचे प्रदेश सचिव करण देवतळे, अमित चवले, नगरसेविका सुनीता काकडे, सायरा शेख, गजाजन राऊत, पप्पू साखरीया, विलास गयनेवार, अभिजित गयेनेवार, राजू दोडके, बाबू भोयर, महेश श्रीरंग, अमित आसेकर, दिलीप घोरपडे, एसटीचे किशोर भोयर, राजू समर्थ, सौ. वैशाली भोयर, श्री. पाल, ओम यादव, डोमा खिरटकर आदींसह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व एसटीचे कामगार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने