खुलेआम तलवारी घेऊन फिरणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी केली अटक #police #arrested

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- तलवारी घेऊन फिरणाऱ्या दोघांना माजरी पोलीसांनी अटक केली आहे. याबिब सिद्दीकी, अनूप खंडारे असे आरोपींची नावे आहेत. या दोघांवर या पुर्वीही माजरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याची माहीती आहे.
माजरी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार माजरी आवारात तलवारी घेऊन फिरत असलेल्या दोन्ही आरोपींना माजरी पोलिसांनी गजाआड केले आहे. याकीब सिद्दीकी आणि अनूप खंडारे अशी आरोपींची नावे असून दोघेही माजरी येथील रहिवासी आहेत. हातात तलवार घेऊन फिरल्यानंतरच गुप्त माहिती मिळाली.
पोलिसांनी लोखंडी तलवार जप्त केली आहे. या दोन्ही आरोपींवर माजरी पोलिस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.