यंग चांदा ब्रिगेडची मागणी, मनपा आयुक्तांना निवेदन
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- बाबूपेठ येथील महात्मा फुले चौक ते जूनोना चौक पर्यंतच्या मार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. त्यामूळे याची तात्काळ दखल घेत या मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक रुपेश पांडेय, रमेश हुमने, प्रफुल डफ, शिवाशन धवले, रोहित यादव आदिंची उपस्थिती होती.
बाबूपेठ हा चंद्रपूर शहरातील प्रमूख भाग आहे. असे असले तरी या भागाकडे मनपाचे अपेक्षीत असे लक्ष नाही. महात्मा फुले चौक ते जुनोना चौकाकडे जाणाऱ्या मूख्य मार्गाची अक्षर:शा दुरावस्था झाली आहे. त्यातच पाईपलाइन टाकण्यासाठी सदर मार्ग खोदण्यात आल्याने येथे मोठ मोठे खड्डे पडले आहे.
याच खड्यातील मार्गावरुन तारेवरची कसरत करत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. मार्ग पूर्णत: उखडला गेला असल्याने येथे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याचा नाहक त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामूळे याची गांभीर्याने दखल घेऊन सदर मार्गाची तात्काळ दूरुस्ती करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडने दिलेल्या निवेदनातून महानगर पालिका आयुक्त विपीन पालिवाल यांना केली आहे.