आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे विमोचन #chandrapur

घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून केलेली अनेक सेवा कार्ये दिनदर्शिकेत समाविष्ट
चंद्रपूर:- बुधवार 9 फेब्रुवारी रोजी घुग्घुस येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे प्रकाशित केलेल्या नववर्ष-२०२२ च्या दिनदर्शिकेचे विमोचन लोकनेते, विकासपुरुष, लोकलेख समितीचे अध्यक्ष, आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते चंद्रपूर येथील आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
घुग्घुस परिसरात 20,000 दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आलेले आहे. घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून संपन्न झालेली सेवा कार्ये यात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने रुग्णांना आर्थिक मदत, शासकीय योजनांची नि:शुल्क माहिती, घुग्घुस येथील 357 कुटुंबाना उज्ज्वला गॅस योजनेतून मोफत गॅस जोडणी वाटप, निराधार महिलांना योजनेचा लाभ, 527 गरजुंना मोफत पॅन कार्ड काढून देण्यात आले. 2,000 हजारांच्या वर गरजूना ई-पास काढून देण्यात आले, कोरोना काळात गरिबांना मोफत जेवण मिळण्यासाठी दोन शिवभोजन केंद्र सुरु, आयुष्यमान भारत व इतर योजनेतून 2,000 च्या वर रुग्णांना मदत, डान्सचा सराव करतांना मरण पावलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना 75 हजाराची आर्थिक मदत, कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, 1,000 च्यावर गरजूना शिधापत्रिका मोफत बनवून दिले, जेष्ठ नागरिकांना काठीचे वाटप, मोफत चष्मे वाटप, जेष्ठ नागरिकांची सेवाग्राम येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ई-श्रम कार्ड 1,300 मजुरांना काढून देण्यात आले, कोरोना काळात 20,000 हजाराच्या वर गोर गरिबांना मोफत धान्य किटचे वाटप, रक्तदान शिबिरात 1,019 रक्तदात्यांचे रक्तदान, 207 बचतगटांची निर्मिती व 161 बचत गटांना शासनाद्वारे कर्ज वाटप अश्या अनेक कामांच्या माहितीमुळे ही दिनदर्शिका अतिशय उपयोगी झालेली आहे.
याप्रसंगी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी पं. स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी ग्रा.पं.सदस्य साजण गोहणे, बबलू सातपुते, प्रा. हेमंत ऊरकुडे, शरद गेडाम, राजेंद्र खांडेकर, अमोल तुळसे, मोहन चलाख उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत