Top News

गडचिरोली येथील राजमुद्रा युवा प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने मुतनूर टेकडीवर स्वच्छता मोहीम #gadchiroli #mutnur

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गडचिरोली:- जिल्ह्यातील मुतनूर विविध प्रेक्षणिय स्थळे, गड, किल्ले आहेत. त्यात स्थळांची स्वच्छता मोहीम राबवुन प्लास्टिकच्या कचऱ्यांचा विल्हेवाट लावण्यांची शपथ घेत गडचिरोली येथील राजमुद्रा युवा प्रतिष्ठान संस्थेच्या ८ ते १० सदस्यांकडुन सुमारे १० ते १५ पोती कचरा संकलित करुन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
मुतनुर येथिल टेकळीवर प्लास्टिकच्या कचऱ्याचे साम्राज्य दिसुन येते. सुट्यांचे दिवस असले की, मुतनुर येथे गडावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांकडुन प्लास्टिकच्या पिशव्या खाद्य पदार्थाचे प्लास्टिक, कागद, पाण्याच्या शित पेयाच्या खाली बाटल्या बेजबादारपणे फेकल्या जातात.
यामुळे पर्यावरणाची मोठी हाणी होते. घाणीमुळे गडावर अस्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत सदस्यांसह ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला यापैकी मुतनुर गडाच्या पायथ्यापासुन गडाच्या टोकापर्यंतच्या या मार्गातील सर्व कचरा उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली. या मार्गामध्ये सुमारे १० ते १५ पोती कचरा संकलित करण्यात आला.
गडचिरोली राजमुद्रा युवा प्रतिष्ठान चे धनंजय सहदेवकर, सुभम शेटटीवार, अविनाश भुसारी, प्रलय चाहांदे, बिटट्टु बिटपल्लीवार, रुपम निलेकार, अनुज डोनाडकर, यांनी १० ते १० सदस्यांसह ग्रामस्थांनी मुतनुर गडावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. प्रेक्षणिय स्थळ, गड, किल्ले, यांचे पावित्र्य राखणे आपले आद्य कर्तव्य आहे. प्रक्षेनिय स्थळ व गड, किल्ले यावर गेल्यावर प्रत्येकाने स्वयं आचार पाडला पाहिजे परिसरात अस्वच्छता दिसल्यास स्वच्छता करुन पावित्र्य राखले पाहिजे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने