जाहिरात... Advertisement... विज्ञापन

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून भाजयुमो गणेश रामगुंडेवार यांचा सत्कार #Hospitality

चंद्रपूर:- आपल्यातील एक असे व्यक्तिमत्त्व जे कुठेही मान सन्मान मिळविण्याच्या मागे न राहता फक्त आणि फक्त आपल्या सामाजिक कार्य करण्यात व्यस्त असतात. पण उशिरा का होईना आज गणेशभाऊच्या कार्याला योग्य तो मान देऊन सन्मान केला जात आहे. आणि या सन्मानाणे गणेशभाऊंचा सामाजिक कार्यात नक्कीच उत्साह वाढविणारा आहे. भाऊच्या कार्याबद्दल कितीही सांगितले तरी शब्द अपुरे आहेत. गणेश भाऊ रामगुंडेवार यांनी कोरोना काळात अतिशय मोलाची कामगिरी बजावल्या बद्दल दि. 27 फेब्रुवारी ला मथुरा स्पोर्ट्स क्लब तर्फे स्थळ टागोर शाळेच्या भव्य पटांगणावर कोरोना योद्धा या भूमिकेतून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचावर उपस्थित भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.रघुवीर हं. अहीर, भाजपा मध्य बाजार मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, भाजपा ओबीसी मोर्चा महानगर चंद्रपूर अध्यक्ष विनोदजी शेरकी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी, मथुरा स्पोर्ट्स क्लब चे जेष्ठ पदाधिकारी आणि पटांगणावर उपस्थित सर्व खेळाडूंनी व प्रेक्षकांनी भाजयुमो मध्य बाजार मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार यांचे सत्कार व अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत