Top News

माणिकगड (गडचांदुर) येथील तोफे चे संवर्धन करण्याबाबत सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर तर्फे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन #Korpana #chandrapur


चंद्रपूर:- सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली १३ वर्ष राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवर दुर्गसंवर्धन मोहीम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबवित आहेत. किल्ले माणिकगड येथील गेली 50 वर्ष झाली. एक तोफ बुरुजावरून खाली पडलेली आहे. सह्याद्री प्रतिष्ठान जिल्हा चंद्रपूर मधील दुर्गसेवक संवर्धन करिता प्रयत्न करीत आहेत. परंतु काही आर्थिक अडचणी मुळे तोफ गडावर नेण्यासाठी अडचण येत आहे.


सदर तोफेस संवर्धन करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर चा वतीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र उपाध्यक्ष दिलीप रिंगणे, विदर्भ संपर्क प्रमुख निमेश मानकर, दुर्गसेवक संजय तुरीले, जिल्हा संयोजक प्रज्वल गर्गेलवार, शहर अध्यक्ष श्याम बोबडे, शुभम कोरम, सदस्य हर्षल येरेवार, प्रियान बोरकुटे, तुषार चहारे, प्रतीक नगरकर ,केतन दूरसेलवार, अंकुश जिझिलवार, गौरव दुरुतकार, तेजस जिझिलवार उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने