चंद्रपूर:- भानापेठ प्रभागाचे नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्या सुसज्ज जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी वित्त नियोजन व वने मंत्री, लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.
भानापेठ येथील साईसुमन निवासस्थानी जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून जनसेवा घडावी, अशी आशा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली. यावेळी त्यांनी इथे असलेल्या सोयीसुविधा आणि सीसीटीव्ही यंत्रणा, व्यवस्थेचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी महापौर राखीताई कंचर्लावार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, राजेंद्र कंचर्लावार, सभागृह नेता देवानंद वाढई, भाजपचे कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, प्रभागातील नगरसेवक संजय कंचर्लावार, नगरसेवक राजेंद्र अडपेवार, नगरसेविका आशा आबोजवार, स्थायी समितीचे माजी सभापती रवी आसवानी, भाजपचे राजेंद्र खांडेकर आदींची उपस्थिती होती.