भूमिपूजन तर झाले, कामही सुरू झाले, मग रस्ता गेला कुठे? #Korpana #road

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- सिमेंट नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत गडचांदूर ते घोडामगुडा रस्त्याच्या बांधकामाचे भूमीपूजन होऊन दीड ते दोन वर्षांचा कालावधी झाला. प्रत्यक्ष कामाला कधी सुरूवात होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दीड वर्षांपूर्वी मा. आमदार साहेब यांच्या हस्ते या होणाऱ्या भावी रस्त्याचे भूमिपूजन थाटामाटात झाले होते, यासाठी निधीही उपलब्ध असल्याचे त्यावेळी सांगितले होते,पण भूमीपूजनला दीड वर्षाचा कालावधी लोटूनही फक्त रस्त्यावर खडीकरण झाले आहे, पहिले तरी रस्ता चांगला होता सपाट होता त्यामुळे काही अडचण नव्हती पण जेव्हापासून खडीकरण झाले आहे, तेव्हापासून या रस्त्यावर खडीकरणामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले असे त्या भागातील नागरिकांनी सांगितले.


काम फार धिम्या गतीने होत आहे.काम पूर्ण केव्हा होणार असा सवाल ररस्त्यामुळे त्रस्त झालेले प्रवासी वाहनचालक विचारत आहेत़ याच मार्गावर काही ठिकाणी कामाला सुरुवात झाले नसल्याचे दिसून येत आहे़. सबग्रेड (मुरुम भराव) च्या कामा -पलीकडे काही काम सरकता सरकत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ .पावसाळ्यात हा मार्ग वाहनचालक व प्रवाशांना डोकेदुखी ठरणार आहे़ कामाला सुरुवात झाली तेव्हापासूनच काम दर्जाहीन होत असल्याची ओरड सुरू झाली़ होती काही सुज्ञ नागरिकांनी याबाबत विचारणा सुद्धा केली होती पण नप प्रशासनाने याकडे कानाडोळा करत दुर्लक्ष केले ही चिंतेची बाब आहे़.
मोठा गाजावाजा करून मा आमदार यांच्या हस्ते कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला़ त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण झाली़ कामही गुतेदाराला मिळाले़ मात्र ज्या गुत्तेदाराला हे काम मिळाले त्याने फक्त बिल उचलून खायला कामे घेतली काय असा प्रश्न स्थानिक नागरिक व शेतकरी विचारात आहेत .लवकारात लवकर जर रस्त्याचे काम केले नाही तर आम्ही या रस्त्यावरील रहदारीच बंद करून टाकू असे स्थानिक नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हटले.