भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात आंदोलन
कोरपना:- कोरपना तालुक्यातील एन्यूटी हायब्रीड अंतर्गत सुरू असलेल्या नारंडा-अंतरगाव (बु)-कवठाळा-नांदगाव(सूर्या)-पवनी रस्त्याचे बांधकाम अतिशय संथ गतीने सुरू आहे सदर रस्त्याचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्यात यावे याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात अंतरगाव बु येथे आंदोलन करण्यात आले.यावेळी नारंडा येथील सरपंच अनुताई ताजने,अंतरगाव (बु) येथील सरपंच सविताताई पोडे,शेरज बु येथील सरपंच अरविंद तिराणकर,लोणी येथील उपसरपंच अविनाश वाभीटकर,नारंडा उपसरपंच बाळा पावडे,भोयगाव माजी सरपंच बंडू जुनघरी,हिरापूर माजी सरपंच प्रमोद कोडापे,नारंडा माजी सरपंच वसंता ताजने यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री, जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व राजुरा विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार अँड.संजय धोटे यांच्या प्रयत्नाने सदर रस्ते मंजूर करण्यात आले होते, व सदर रस्त्याचे सन २०१८-१९ मध्ये कामसुद्धा सुरू करण्यात आलेले होते,परंतु ३ वर्ष उलटून सुद्धा रस्त्याचे बांधकाम पूर्ण झालेले नाही व रस्त्याचे बांधकाम अतिशय संथ गतीने सुरू आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच रस्त्याच्या धूळीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान होत आहे.तसेच जागोजागी पुलाचे बांधकाम कित्येक महिन्यांपासून निर्मानाधीन असून पुलाचे बांधकाम अतिशय संथ गतीने सुरू आहे,त्यामुळे अंतरगाव बु,गाडेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे,तसेच इरई बोरगाव फाट्याजवळील डांबरीकरणसुध्दा पूर्णपणे खराब झालेले आहे या सर्व मुद्द्यांना घेऊन परिसरातील नागरिकांनी अंतरगाव बु येथे आंदोलन केले.
यावेळी हिरापूर माजी सरपंच प्रमोद कोडापे,सांगोडा माजी सरपंच सचिन बोंडे यांची भाषणे झाली,तसेच येणाऱ्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रस्त्याचे व पुलाचे बांधकाम काम जलदगतीने पूर्ण न केल्यास गावागावातील नागरिक रस्त्यावर येईल असा इशारा भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी दिला.
आंदोलनाच्या घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आकाश बाजारे उपस्थित होऊन त्यांनी नागरिकांशी रस्त्याबाबत सविस्तर चर्चा करून येणाऱ्या काळात लवकरात लवकर सदर रस्त्याचे काम पूर्ण करू असे सांगितले तसेच अंतरगाव बु येथील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या समस्येबाबत निराकरण केले.
यावेळी बंडू वडस्कर,नितीन पोडे,विनोद सूर,अमोल भोंगळे,गणेश गिरसावडे,अनिल मालेकर,सत्यवान चामाटे,अजय तिखट,प्रवीण हेपट, गजानन चतुरकर,अरुण निरे,विशाल पावडे,नवनाथ ढवस,गजानन लांडे,अनिल मोहितकर,विजय लांडे,सुधाकर नक्षीने, सतीश मुसळे,दशरथ बोंडे,विवेक वडस्कर,प्रवीण साखरकर,महेश बिल्लोरिया, प्रमोद शेंडे,महेंद्र वडस्कर,राजेंद्र आगलावे,प्रमोद बांदूरकर,सुनील टोंगे,विकास साखरकर यांची उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाचे संचालन संदीप टोंगे व आभार प्रदर्शन रमेश वेट्टी यांनी केले.यावेळी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.