Top News

कुनघाडा रै येथे सामाजिक जागृक्ता व भागीदारी प्रशिक्षण कार्यक्रम #Chamorshi

हमरा संकल्प उत्तराखंड यांचा उपक्रम
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार नई दिल्ली द्वारा संघटन प्रशिक्षण पाठ्यक्रम योजनेंतर्गत हमरा संकल्प उत्तराखंड यांच्या उपक्रमातू जेंडर रिस्पंसिव्ह माध्यमातून सामाजिक जागृक्ता व सामाजिक भागीदारी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम किसान भावन सभागृह कुनघाडा रै येथे पार पडले.
प्रशिक्षणात लिंगभेद, महिलांचा विकास, ग्रामपंचायत जेंडर बजेटिंग , गाव विकास आराखडा इत्यादी विषय घेण्यात आले. मुख्य प्रशिक्षक म्हणून पंचायत राज प्रशिक्षण केंद्र गडचिरोली येथील अर्चना चुधरी, सहायक प्रशिक्षक स्वेता साहू यांनी काम पाहिले , प्रशिक्षणाला कुनघाडा, तळोधी सर्कलमधील सर्व महिला सरपंचा, उपसरपंचा, सदस्या, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महिला बचत गटाच्या अध्यक्षा, सचिव प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होत्या

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने