Click Here...👇👇👇

भाजपाने जाहिर केली पालिका निवडणुकांसाठीची जिल्हानिहाय जबाबदारी #Mumbai

Bhairav Diwase
वाचा तुमचा जिल्हा कोणत्या नेत्याकडे
मुंबई:- राज्यातील अनेक मोठमोठ्या शहरांमधील महानगरपालिकांच्या निवडणूका आता सुरु होणार असून यासाठी सर्वच पक्षांनी प्रचाराचे जाहीर नाही मात्र छुपे रणशिंग फुंकले आहे.
दरम्यान या वेळच्या निवडणूका मागील निवडणुकांपेक्षा वेगळ्या आणि अवघड असणार आहेत त्या भारतीय जनता पक्षासाठी, कारण आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा सर्वच शहरांमध्ये होणार आहे.
याआधी शिवसेना-भाजप एकत्र असायचे किंवा स्वतंत्र लढले तरी यामध्ये त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष असायचा मात्र आता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढत होणार आहे.
आणि याच पार्श्वभूमिवर आता भाजपने रणनिती आखायला सुरुवात केली असून त्यांसाठीच आज भाजपाच्या कोअर कमिटीमध्ये येऊ घातलेल्या महापालिका निवडणूकासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून या बैठकीत जिल्हानिहाय जबाबदारीचे वाटप भाजपा नेत्यांना देण्यात आले.
आणि ती जबाबदारी कोणत्या नेत्याला कोणती दिली आहे ती पुढीलप्रमाणे.

मुंबई पालिका निवडणुकिसाठी आशिष शेलार यांना जबाबदारी देण्यात आली

ठाणे पालिकेसाठी निरंजन डावखरे

नागपूर पालिकेसाठी सुधीर मुंनगंटीवार

उल्हासनगर पालिकेसाठी कुमार ऐलानी

कोल्हापूर पालिका धनंजय महाडीक

सोलापूर पालिकेसाठी विजय देशमुख

पुणे पालिकेसाठी राजेश पांडे

चंद्रपूर पालिका चंद्रशेखर बावनकुळे

पिंपरी पालिकेसाठी माधुरी मिसाळ

नाशिक पालिकेसाठी गिरिष महाजन प्रभारी जयकुमार रावल सहप्रभारी पालिकेसाठी

औरंगाबाद पालिका डॉ भागवत कराड

लातूर पालिकेसाठी संभाजी निलंगेकर

परभणी पालिकेसाठी बबनराव लोणीकर

लातूर पालिकेसाठी संभाजी निलंगेकर

अकोला पालिकासाठी रणधीर सावरकर

या प्रकारे भाजपने आपल्या नेत्यांना जाबाबदारी वाटून दिली आहे.