ऐटीत चालणाऱ्या पाच वाघांचा विडीओ व्हायरल
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात वाघ दिसणे हे आता फार नवलाईचे राहीले नाही. मात्र एकाच वेळी पाच वाघ दिसतील तर? आहेच की नवल...! ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्पात बफर मध्ये येणाऱ्या घोसरी मार्गावर तब्बल पाच वाघ एकत्र ऐटीत जात असल्याचा विडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
यात दिसणारे चार बछळे, एक वाघीण असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. एकाच वेळी पाच वाघ दिसत असल्याने वाघ प्रेमींचा चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. एकीकडे या पाच वाघांचा विडीओ मोठ्या आवडीने समाजमाध्यमात बघीतले जात असले तरी आता वाघ, बिबट, अस्वल थेट शहरात दाखल होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.