Top News

जनसेवेत स्वतः ला झोकून गावाचा विकास साधावा:- माजी आमदार अँड. संजय धोटे #rajura

मथरा येथे कीर्तन महोत्सवाला सुरुवात
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा 
राजुरा:- संप्रदायीक परंपरेतून गावकऱ्यांनी एकत्र येत गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणावा. जनसेवेतून अनेक मोठे कार्य सहजरीत्या पार पाडता येते, आजच्या संप्रदायाचे कार्यक्रमातून व कीर्तनातून गावकऱ्यांनी बोध घेऊन जनसेवेत स्वतःला झोकून देत गावाचा विकास साधण्याचे आवाहन माजी आमदार संजय धोटे यांनी केले.
राजुरा तालुक्यातील मौजा माथरा येथे श्री. गुरुदेव दत्त सांप्रदायिक मंडळ, माथरा द्वारा आयोजित प.पु.श्री. सदगुरु नामदेव महाराज रोकडे यांच्या पुण्यस्मरणार्थ किर्तन महोत्सव कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार संजय धोटे, उदघाटक माजी आमदार सुदर्शन निमकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सभापती सुनील उरकुडे, नगरसेवक राजेंद्र डोहे, भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे, सिनू पांजा, दिलीप वांढरे, ह.भ.प. दत्ता महाराज मसे, आरोग्य अधिकारी डॉ. मिस हाजीर यांची उपस्थिती होती.
आईचे व संतानी केलेले संस्कार हे जीवनात मार्गदर्शक ठरत असतात. या जीवनात गुरु शिवाय मार्ग नाहीत, त्यामुळे संप्रदायीक सेवेतून लोकांनी बोध घ्यावा असे मत ह.भ.प. दत्ता महाराज यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी यथोचित मत व्यक्त केले. हा कार्यक्रम पुढील दोन दिवस चालणार असून नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
     कार्यक्रमाचे प्रस्तावित व संचालन सरपंच हरिदास झाडे यांनी तर आभार अतुल चाहरे यांनी मानले. प्रसंगी परिसरातील गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने