Top News

जिल्हा परिषद चंद्रपूर नर्सेस संघटनेची नवीन कार्यकारणी गठीत #chandrapur#Rajura

जिल्हाध्यक्षा गीताताई खामनकर तर सचिव पदी रंजना कोहपरे
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा 
राजुरा:- महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची स्वर्गीय दादासाहेब कन्नमवार सभागृहात विशेष बैठक झाली त्यात संघटनेची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली त्यात जिल्हाध्यक्षा म्हणून गीताताई खामनकार तर सचिव म्हणून रंजना कोहपरे यांची निवड करण्यात आली.

या बैठकीत अध्यक्ष म्हणून संघटनेच्या राज्य सरचिटणीस लताताई पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून मायाताई सिरसाट,नीलिमाताई तातेकर व पदाधिकारी उपस्थित होते,सभेत आरोग्य सेविकाच्या प्रलंबित मागण्या,प्रलंबित देयके,व होणाऱ्या अन्यायाबाबत चर्चा करण्यात आले व संघटनेच्या माध्यमातून त्याचे निराकरण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला
यानंतर चंद्रपूर जिल्ह्यची नवीन नर्सेस संघटनेची कार्यकारणी सर्वानुमते गठीत करण्यात आली यात जिल्हाध्यक्ष गीताताई खामनकार,सचिव रंजना कोहपरे,उपाध्यक्ष यशोदा राठोड,काजल फुलझले,पदमा मदनकर,उजवला गजभिये,मंदाकिनी चुणारकर,सुनीता धुडसे,,सहसचिव पदी वृषाली वासनिक,सरिता गेडाम,भागवत,हर्षा गीते,कीर्ती कुलमेथे,चित्रा नागरे,जिल्हा संघटक म्हणून ज्योत्स्ना खिरटकर,सुवर्ण आमडे,भावना मणारे,शशिकला बावणे,गीता शेडमाके,सुनंदा आत्राम यांची निवड करून समिती गठीत करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने