Click Here...👇👇👇

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड #Rajura

Bhairav Diwase
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- विरुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धानोरा परिसरात गस्त करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे विरूर पोलिसांनी धानोरा येथे धाड टाकून जुगार खेळत असतांना रंगेहात पकडून सात आरोपीना अटक करण्यात आली.
यात आरोपीची झडती घेऊन एकूण दोन हजार नव्वद जप्त करण्यात आले. यातील आरोपी किशोर सखाराम जुलमे वय वर्ष 47,राजू पांडुरंग गाव्हारे वय वर्ष 33,भारत बाबुराव मेश्राम वय वर्ष 35, रामदास महादेव मडावी वय वर्ष 30, प्रभाकर विश्वनाथ मोरे वय वर्ष 40, अरविंद विठोबा दरवेकर वय वर्ष 30, सुरज बंडू टेकाम वय वर्ष 26, हे सर्व रा. धानोरा ता. राजुरा. जि. चंद्रपूर यांना जुगार खेळताना पकडण्यात आले.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, पोलीस हवालदार भुजंगराव कुरसंगे, सचिन थेरे, सुरेंद्र काळे, प्रमोद मिलमिले यांनी पार पाडली.