Click Here...👇👇👇

गोठ्यात बांधलेल्या बकऱ्या गेल्या चोरीला #Theft

Bhairav Diwase
एकास अटक तर दुसरा फरार
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्यांच्या कळपातून अचानक दोन अज्ञात चोरट्यांनी बांधलेल्या बकऱ्या चोरून नेल्या त्यानंतर अज्ञात चोरट्यांची तक्रार बकरी मालक यांनी पोलीस स्टेशन विरूर येथे दिली. त्या तक्रारीच्या आधारे विरूर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर दोन आरोपीवर गुन्हा दाखल केला.
सविस्तर वृत्त असे की, राजुरा तालुक्यातील येत असलेल्या विरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुणीतरी अज्ञात इसमाने गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरून नेल्याची तक्रार दिनांक 08/02/2022 ला पोलीस स्टेशनला दिली. तक्रारीच्या आधारे विरूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांनी तपास चक्र फिरवली व घटनास्थळाची पाहणी करून चौकशी केली. या बकऱ्या चोरणारा नेमका कोण? यांचे लक्कडकोट चेक पोस्ट परिसरात लावून असलेल्या सीसीटीव्हीच्या गोपनीय माहितीच्या आधारे चौकशी केली असता व, चौकशीअंती दोन इसम आढळून आले. यातील आरोपी 1) गणेश पांडुरंग किनाके वय 22 वर्ष, 2) काशीद शेख उर्फ बबलू हे दोन्ही आरोपी लक्कडकोट येथील रहिवासी आहेत. गणेश पांडुरंग किनाके याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून काशीद शेख उर्फ बबलू हा आरोपी फरार झालेला आहे. फरार आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.
सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिवाकर पवार, मल्ल्या नर्गेवार, सविता गोनेलवार, लक्ष्मीकांत खंडाळे, प्रमोद मिलमिले, सुरेंद्र काळे, यांनी केली.