Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

ब्रम्हपुरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे विद्युतीकरणासाहित चौपदरी सिमेंटीकरण करा #bramhpuri


केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांची मागणी

तालुक्यातील लाडज व नान्होरी जवळील पुल तयार करण्याचीही केली विनंती
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी शहरातून राष्ट्रीय महामार्ग 353-डी हा जात असून सदर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण नगरपरिषद ब्रम्हपुरी च्या हद्दीपर्यंत झाले आहे. परंतु ब्रम्हपुरी शहराच्या सौंदरीकरणाच्या दृष्टीने सदर महामार्गाचे ब्रम्हपुरी शहरातून विद्युतीकरण सहित चौपदरी सिमेंटीकरण होणे आवश्यक आहे. या संदर्भात ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री मंत्री ना. नितीनजी गडकरी साहेब यांची नागपूर येथे भेट घेऊन सदर काम करण्याची मागणी केली. मागणीचे पत्र प्रा. अतुल देशकर यांनी ना. नितीनजी गडकरी यांना दिले.
या सोबतच ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज गावाजवळील प्र. जी. मा. 78 कि. मी २४/०० मध्ये वैनगंगा नदीच्या स्पिलवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासंदर्भात सुद्धा निवेदन देण्यात आले. तसेच ब्रम्हपुरी तालुक्यातील प्र.जि. मा १२३ वरील की.मी १३/०० नान्होरी गावाजवळील नादुरुस्त पुलाचे पूर्ण करण्याबाबत ही पत्राद्वारे विनंती केली. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सदर पूल आवश्यक असल्याचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.
सदर कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा विश्वास ना. नितीनजी गडकरी यांनी माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांना या वेळी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत