वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार #tiger #tigerattack #chandrapur

Bhairav Diwase
0
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी समोर आली.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वनपरीक्षेत्रात सितारामपेठ येथील नमो संभा धांडे (५५) हा गुराखी आपली जनावरे चरण्यासाठी सराई रिसोर्टमागे दम बाजूला गेला होता.
त्यावेळी वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला चढवित त्याच्या नरडीचा घोट घेतला. याबाबतची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. मृतकाचे कुटुंबियांना ३० हजारांची तातडीची मदत देण्यात आली असून गस्त वाढविण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)