ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका 22 वर्षीय युवकाने घराशेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना दिनांक ३१ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून फिर्यादी युवतीने ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी आशिष घनश्याम राऊत वय (२०) याला पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, आरोपी आशिष घनश्याम राऊत याचे घराशेजारी राहणाऱ्या युवती सोबत बऱ्याच दिवसांपासून फेसबुक संदेशवरून बोलणे सुरू होते. याचाच फायदा घेत आरोपीने युवकाने फिर्यादी युवतीला ३१ जानेवारीच्या रात्री मंदिराच्या आवारात भेटायला बोलावले असता फिर्यादी युवती आरोपी युवकाला भेटण्यासाठी गेली. आज जशी भेटायला आलीस त्याचप्रमाणे उद्या पण भेटायला येशील अशी बळजबरी करू लागला नाही, तर या सर्व प्रकरणाची माहिती तुझ्या आई-वडिलांना देतो म्हणून धमकावीत दुसऱ्या दिवशी बोलावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. हा सर्व घटनेचा प्रकार फिर्यादी युवतीने आई-वडिलांना सांगितल्यानंतर २ फेब्रुवारी २०२२ रोजी आरोपी आशिष घनश्याम राऊत वय (२०) याच्या विरोधात ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
त्यानुसार ब्रह्मपुरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध
भादंवि कलम ३७६,३७६/३, ३५४,अ,पोक्षाचे कलम ४आणी ८ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्यानुसार आरोपीची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पुढील घटनेचा तपास ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर करीत आहेत.