Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

आज भाजपा महानगर चंद्रपूर तर्फे 'त्या' नोटिशीची होळी #bjpchandrapur #chandrapur #notice #Holi

चंद्रपूर:- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली याचा तीव्र निषेध करीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्या नोटीशीची होळी करण्याचा आदेश पक्ष कार्यकर्त्यांना दिला होता. त्या अनुषंगाने रविवारी महाात्मा गांधी चौक येथे "त्या" नोटिशीची होळी करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविला.
महाविकास आघाडी सरकारच्या सायबर सेल पोलिसांनी फडणवीसांना पाठविलेल्या नोटिसीचे दहन केले. भाजपा कार्यकर्त्यांनी आक्रमक होत ठाकरे सरकारच्या धोरणाविरुद्ध घोषणाबाजी केली. यावेळी लोकलेखा समितीचे अध्यक्ष, माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत