तुमरीगुडा येथे सल्लाशक्तीचे अनावरण
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- मानवी आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल ते म्हणजे शिक्षण, शिक्षणाशिवाय माणसाला दुसरा पर्याय पर्याय नाही, शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती अशक्य आहे त्यामुळे आदिवासी समाजाने शिक्षणातुन प्रगती साधावी असे प्रतिपादन गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी केले.
ते तुमरीगुडा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात सल्लाशक्तीचे उदघाटन करण्यात आले.
ते तुमरीगुडा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात सल्लाशक्तीचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी मंचावर गोंडवाना गणतंत्र पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंगजी जाधव, कोयापुनेम प्रचारक विकासदादा कुळमेथे, गो. ग. पा. महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते महेबूब शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ममताजी जाधव, जिवतीचे माजी सभापती भीमरावजी मेश्राम, नगरसेविका सतलूबाई जुमनाके, माजी जिल्हा परिषद सदस्या प्रियाताई सोनकांबळे, नगरसेवक लक्ष्मीबाई जुमनाके, नगरसेवक क्रिष्णा सिडाम, जिवती येथील सामाजिक कार्यकर्ते मंगुजी मडावी, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राजुरा तालुकाध्यक्ष अरुण उदे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कोरपना तालुका प्रसिद्धी प्रमुख संकेत कुळमेथे, प्रवक्ता अश्विनी कोरांगे, युवा मोर्चा प्रसिद्धी प्रमुख मंगेश पंधरे सोनेराव पा. पेंदोर माजी सरपंच, केशव कोहचाळे, वासुदेव गेडाम, जयदेव आत्राम पाटण, सुधाकर राठोड उपसरपंच चिखली व मान्यवर उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले त्यासोबतच सामाजिक कार्यकर्ते मंगुजी मडावी यांनी पेनवासी गोदरुजी पाटील जुमनाके यांच्या जीवनचरित्रावार आधारवर गीत सादर करून आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कुळसंगे यांनी तर प्रास्ताविक गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कोरपना तालुका प्रसिद्धी प्रमुख संकेत कुळमेथे यांनी केले यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी गोंडी नृत्य सादर करून मान्यवरांचे जंगी स्वागत केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुमरीगुडा येथील समाजबांधवांनी आणि गावकर्यांनी परिश्रम घेतले.