Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

दोन दुचाकींच्या धडकेत सलून व्यवसायी गंभीर जखमी #chandrapur

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- दोन दुचाकींची धडक बसून सलून व्यवसायी गंभीर जखमी होण्याची घटना आज दि. १२ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान भद्रावती शहरात घडली.
बंडू लांडगे (५०) असे गंभीर जखमी सलून व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचे येथील भाजी मार्केट जवळ सलूनचे दुकान आहे. त्यांचे शहरातील एकतानगर येथे घर आहे.आज दुपारी ते घरुन जेवण करुन दुकानाकडे परत येत असताना डॉ. अवताडे यांच्या दवाखान्याजवळ एकतानगर वार्डातील रहिवासी रसिद शेख (३६) यांच्या दुचाकी क्र.एम.एच.३४ क्यू.४०३९ ने लांडगे यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. त्यामुळे लांडगे यांच्या डोक्याला, नाकाला, तोंडाला व डोळ्याला जबर मार लागला. त्यांना प्रथम येथील शिंदे हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सेवाग्राम (वर्धा) येथे हलविण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत