Top News

देवालय सोसायटीत जागतिक महिला दिन साजरा #bhadrawati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील देवालय सोसायटीत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भद्रावती शहरातील देवालय सोसायटी ही नुकतीच एक दोन वर्षापुर्वी तयार करण्यात आली असून या सोसायटीमध्ये विविध धर्माचे व बाहेर गावून येऊन येथील लोक स्थायी झाले. तेथील नागरिक कोणताही उत्सव एकत्र येऊन साजरा करीत असतात. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्व महिलांनी एकत्र येऊन जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी सीमा वाकडे, निलेशा बिश्वास, मीनाक्षी आत्राम, हर्षदा चटपल्लीवार, रेखा संकुरवार, रीना निमसरकर, किरण राऊत, रेश्मा मेघरे, शिल्पा नगराळे, आदी महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी मिनाक्षी आत्राम यांनी उपस्थित महिलांना व युवतींना मार्गदर्शनात सांगितले की, प्रत्येक स्त्रीला भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्य दिले. त्यामुळे प्रत्येक महिलेने आत्मविश्वास बाळगायला हवा. ज्यामुळे आजच्या स्पर्धात्मक यूगात डिजिटल आय.टी. क्षेत्रात महिलांची उन्नती होऊ शकते. फक्त जुने पारंपरिक क्षेत्र न निवडता आजच्या भविष्याचा विचार करुन जाॅब मिळविण्याचा विचार करावा.त्यामुळे महिलांचे भविष्य बदलू शकते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने