Top News

जागतिक महिला दिनी महिला झाल्या पक्षीमित्र; बांधल्या पक्षांकरीता घागरी #bhadrawati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- जागतिक महिला दिन भद्रावती शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कुठे महिलांसाठी मार्गदर्शन, तर कुठे महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, तर कुठे महिलांसाठी विविध स्पर्धा, तर कुठे महिलांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. परंतु येथील लक्ष्मीनगरातील महिलांनी उन्हाळ्यात पक्षांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांची तृष्णा भागविण्याकरीता चक्क वार्डातील झाडांवर घागरी बांधण्याचा उपक्रम राबवून महिला दिन साजरा केला.
लक्ष्मीनगरातील महिलांनी अशा प्रकारे पक्षांप्रती आपुलकी दाखवून पर्यावरणाचे संरक्षण करण्यास सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पक्षांसाठी घागर बांधण्याच्या उपक्रमात लक्ष्मीनगरातील माधुरी बांदुरकर, सुषमा घोटेकर, अनू टाले, वैशाली ढोके, स्वाती ओलालवार, वंदना बोंडे, प्रेमा पोटदुखे, निरमा तिवारी, राखी सोनुकले, छाया जीवतोडे, विकीशा घडले, मासळकर, निता ढाकणे आणि इतर महिला सहभागी झाल्या होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने