Top News

जिवती तालुक्यातील पोलीस पाटलाची रिक्त पदे तत्काल भरा आम आदमी पार्टीची मागणी #Jivati

जिवती तहसीदारामार्फत पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
जिवती:- तालुक्यात अनेक विभागात वेगवेगळी पदे रिक्त आहेत व अशाच प्रकारचे एक म्हत्वाचे पद म्हणजे पोलीस पाटील गावातील तंटे, भांडण, तक्रारी मिटवण्यासाठी गावात पोलीस पाटील असतो परंतु यातही तालुक्याचे दुदैव म्हणावे लागेल गेल्या कित्येक वर्षांपासून तालुक्यातील अनेक गावामध्ये पोलीस पाटलांची अनेक पदे रिक्त आहेत याचा अतिरिक्त भार शेजारील पोलीस पाटलांना झेलावा लागतो आहे सामान्य माणसाला याचात्रास सहन करावा लागतो आहे साधा दाखला घ्यायचा झाला तरी जवळच्या पोलीस पाटलाकडे जावे लागते ते पोलीस पाटील वेळेवर भेटत नाहीत साध्या तक्रारी सुद्धा पोलीस स्टेशनं ला जातात गावात मिटायचे अनेक तंटे हे पोलीस स्टेशन पर्यंत जातात गावामध्ये गुन्ह्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
यामुळे शासनाने याची गंबीर दखल घेऊन तालुक्यातील रिक्त पदे त्वरित भरावे अशी मागणी आम आदमी पार्टी चे तालुका अध्यक्ष सुनील राठोड तालुका सचिव गोविंद गोरे संघटनमंत्री जिवन तोगरे उपाध्यक्ष राजेश दुधाटे नितेश करे कोषध्यक्ष गोपाळ मोहिते अरविद चव्हाण श्रीराम सानप मुकदम शेख ज्ञानेश्वर राठोड शेकुराव काटमोडे पांडुरंग काटमोडे आदींची उपस्थिती होती

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने