जाहिरात... Advertisement... विज्ञापन

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राजीव गांधी, अष्टभुजा, रमाबाई, नरेंद्र व शिवशक्ती नगर येथील महिलांचा भाजपात प्रवेश #bjpchandrapur

महानगर भाजपाचे आयोजन
चंद्रपूर:- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने साधून शिवशक्ती, नरेंद्र, रमाबाई, अष्टभुजा, व राजीव गांधी नगर येथील शेकडो महिलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मंगळवार (8 मार्च)ला प्रवेश घेतल्याने मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे.

भाजपा महानगर जनसंपर्क कार्यालय जटपूरा गेट येथे पार पडलेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, विधानसभा प्रमुख प्रमोद कडू, महामंत्री रवींद्र गुरनुले, सचिव रामकुमार आक्कापेल्लीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी डॉ गुलवाडे यांनी सर्व महिलांचे भाजपाचा दुपट्टा देऊन स्वागत केले. यावेळी ते म्हणाले, लोकनेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात जिल्हा नाही तर महाराष्ट्र प्रगती करीत आहे.त्यांचे आम्हाला नेतृत्व लाभले हे आमचे सौभाग्य आहे. आपल्या प्रवेशामूळे भाजपा बळकट होईल.स्त्री ही आदिशक्ती आहे. तिच्यात प्रचंड क्षमता आहे. या क्षमतेचा वापर चूल-मुल पर्यंत मर्यादित न ठेवता राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी करावा. असे ते म्हणाले. यावेळी जेष्ठनेते प्रमोद कडू यांनी मार्गदर्शन केले.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये सुमन यादव, सुनीता जोलमवार, सुशीला नगराळे, हिरामणी पाल, उत्तरा सरकार, गीता मेंढे, ज्योती वाकुडकर, शालिनी बिसेन, जैनी बीरेंनवार, संगीता नंदी, जयंती बिस्वास, कावेरी शाहा, शारदा शिल्वेलकर, रुपाली चौधरी,दिपाली कोसरे, कमलकुमार ओझा या महिलांचा समावेश होता. तर ,राजेंद्र केवट, डॉ. इंद्रजित बाछार, उमेश केवट, संतोष यादव, अनंत कुलवार, सुधाकर चाकनलवार, लक्ष्मण शर्मा, रामभरोसे निषाद, किशोर रॉय, प्रमोद नगरकर, मदन दास, प्रेमचंद गुप्ता, जयपाल मोहुर्ले या पुरुषांनी प्राथमिक सदस्यत्व ग्रहण करून भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश घेतला. कार्यक्रमाचे संचालन व आभार अकापल्लीवार यांनी केले. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत