(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- जागतिक महिला दिनानिमित्त दि.११मार्च ला राजुरा शहर महीला आघाडी तर्फे विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. त्यात महिलांच्या आभूषणावर आधारित रांगोळी स्पर्धा व गीत गायन स्पर्धा आयोजित केली होती. माता जिजाऊ चया भूमिकेत एकपात्री अभिनय उज्वला किशोर जयपूरकर,नगरसेविका हिने सादर केला. मान. अल्का ताई आत्राम यांनी महिला सक्षमीकरण याबद्दल उत्तम मार्गदर्शन केले व महिलांचा राजकारणात सहभाग असणे खूप आवश्यक आहे असे सांगितले.
महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. Eshram card या कार्यक्रमात वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला मान.अल्का ताई आत्राम भाजपा महिला जिल्हाध्यक्षा व प. स. सभापती, मान. श्री. सुदर्शनजी निमकर साहेब माजी आमदार, मान सौ. विजयालक्ष्मी डोहे माजी नगराध्यक्ष, गडचांदुर न.पंचायत, मान. श्री.सूनीलभाऊ उरकुडे, जि.प.सभापती कृषी व पशू सवर्धन , मान. सौ. सूनंदा ताई डोगे प स सदस्या, सौ रेखाताई देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष, श्रीमती उज्वला जयपूरकर मां. नगरसेविका, सौ. प्रीती रेकलवार मां. नगरसेविका, राधेश्याम अडनिया मां. नगरसेवक, वाघुजी गेडाम आदिवासी नेता, राजु भाऊ डोहे मां.नगरसेवक, सचिन सिंग बैस, व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतसाठी श्रीमती उज्वला जयपूरकर,सौ. प्रिती रेकलवार, श्री. राजू भाऊ डोहे, सौ रेखाताई देशपांडे, श्री. प्रदीप देशपांडे, कांता कदम, गणेश रेकलवार, सचिन बैस, राजू भाऊ वाटेकर, व इतर कार्यकर्ते यांनी सहकार्य केले .