Top News

ग्रामपंचायत सातरी आदर्श गाव योजनेंतर्गत मंजूर सभागृहाचे भुमिपुजन #chandrapur


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा  
राजुरा:- राजुरा तालुक्यातील सातरी येथे ग्रामपंचायत सातरी आदर्श गांव योजने अंतर्गत मंजूर सभागृहाचे भुमिपुजन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित होते.

माझं गाव आदर्श व्हावा असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, परंतू त्यासाठी प्रत्येकाला कष्ट घेण्याची तितकीच गरज असते. लोकसहभाग आणि लोकश्रमातून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो. अशाच पद्धतीने आज सातरीमध्ये आदर्श गांव योजनेतून या सभागृहाचे बांधकाम होत आहे. हे निश्चितच गौरवास्पद आहे.
कार्यक्रमाला मंचावर, माजी आमदार अड. वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, जि. प. सभापती सुनिल उरकुडे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी समाजकल्याण सभापती नीलकंठराव कोरांगे, आबाजी पा. ढुमणे, सरपंचा सौ. पद्माताई वाघमारे, उपसरपंच भाऊराव बोबडे, राजू घरोटे, वाघुजी गेडाम, पुंडलिक पा. वडस्कर, सचिव कु. मंजुषाताई पारखी, पो. पा. विजय पारशिंगे, मारोती पा. पोरे, मंगेश मोरे, ग्रा. प. सदस्या सौ. प्रांजूताई हेपट, निशांत मून, सौ. योगिताताई मुन, सौ. बबिताताई टेकाम, प्रकाश बोढे, सौ. वर्षाताई सातपुते, सचिन डोहे, दिपक झाडे, हितेश गाडगे आदिंसह ग्रामस्थ बंधूभगिनी उपस्थित होते. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने