जाहिरात... Advertisement... विज्ञापन

सचिन भोयर यांची चंद्रपूर जिल्हा संपर्क अध्यक्ष पदी नियुक्ती #MNS

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले नियुक्ती पत्र
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन भोयर यांची जिल्हा संपर्क अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार दिनांक. १४ मार्च ला सिल्वर क्लब मुंबई येथे गुढीपाडवा निमित्त पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. आणि जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
सचिन भोयर हे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यामध्ये प्रसिद्ध असे मानले जाते आणि त्याच अनुषंगाने सचिन भोयर यांना चंद्रपूर जिल्ह्याची मोठी जबाबदारी देण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्या उपाध्यक्ष तथा नगरसेवक सचिन भोयर यांची पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्हा संपर्क अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत