Top News

स्व. कु. शितल मेहताच्या न्याय मागणीसाठी कॅंन्डल मार्च #chandrapur

पठाणपुरा जोळदेऊळ ते जटपुरा गेट पर्यंत निघाला कॅंन्डल मार्च

चंद्रपूर:- दिनांक १६/०३/२०२२ रोजी कु.शितल मेहता राहणार तुकुम वय २२ वर्षे हिचा पडोली पोलीस प्रशासनाने अपघाती मृत्यू झाल्याचे घोषित केले. परंतु तो अपघाती मृत्यू नसून बलात्कार करून तिचा खून करण्यात आला असल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला असल्याने सदर प्रकरणाची चौकशी ही सी.बी.आय.अथवा सी.आय.डी. कडून होऊन प्रकरणाची सत्यता समोर आणून गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करून कु. शितल मेहता व तिच्या कुटुंबियांना न्याय मागणीसाठी कॅंन्डल मार्च काढण्यात आला. पठाणपुरा जोळदेऊळ ते जटपुरा गेट पर्यंत कँडल मार्च निघाला.‌ महात्मा गांधी चौकात व जटपुरा गेट जवळ कॅंन्डल लावून स्व.कु. शितल मेहता हिला २ मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. 
यावेळी आयोजकांनी म्हणाले की, आम्ही अपेक्षीत केलो त्याप्रमाणे लोक आले नाही अशी खंत व अश्या घटना पुढे घडू नये यासाठी पुढच्यावेळी तरी जास्तीत जास्त नागरीकांनी,महिलांनी,तरुणांनी व तरुणींनी एकत्र सहभाग नोंदवावा अशी विनंती केली.
यावेळी नितिश मेहता, बिपिन मेहता, मेहता परीवारातील सदस्य, तसेच विशाल निंबाळकर , विकास खांडेकर, अमित कोडापे, सोनू झोडे, प्रियन बोरकुटे, महेश कोलावार, अभि वांढरे, श्याम बोबडे, सचिन यामावार, कार्तिक खेडेकर, प्रणय राऊत, दक्ष पवार, हर्षल येरेवार, प्रणय डंबारे, श्याम चाफले, गोपाला जोशी, आकाश येलेवार, आदित्य थोरात, राजेश खनके, शोभा वाघमारे, प्रणय दंबारे, राजेश खनके, सचिन खनके, हेमंत आकेवार, राहुल आकेवार, नरेश पटेल, हर्षल येरेवार, अनुप सोनी,  शोभाताई वाघमारे, हर्षद कानंपलिवार, शितल करागडे,  रोहिणी पाटील, आरती समृदलवार, अमोल बोसले, अभिषेक थोडगे, शेखर खाडेकर, पियूष जोशी, चैतन्य जोशी, सचिन तेकुलवार, अनिकेत आगलावे,  आदी समाज सेवक मित्र मंडळी मोठ्या संख्येने स्व. कु. शितल मेहता हिला २ मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.

Click here
👇👇👇👇



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने