४ राज्यातील निवडणूक विजयाबद्दल भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष #chandrapur

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- उत्तर प्रदेश, गोवा, मणिपुर व उत्तराखंड विधानसभा निवडणूकीत अभूतपूर्व यश संपादन करून सत्तास्थानी पोहोचविल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार व्यक्त करीत भाजपा चंद्रपूर महानगराच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
निवडणूक निकालाने या 4 राज्यातील जनतेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वावर व त्यांनी विकासाच्या माध्यमातून देशाकरीता दिलेल्या योगदानावर विश्वास दाखविल्याची ही पावती असून हा विजय विचारांचा, विकासाचा तसेच लोकशाहीच्या उदात्त मुल्यांचा असल्याची प्रतिक्रीया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केली आहे.
भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे दि. 10 मार्च 2022 रोजी भाजपा कार्यकत्र्यांनी 4 राज्यामध्ये भाजपाला मिळालेल्या विजयासाठी फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये गुलाल उधळुन विजयी जल्लोष केला. यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, महानगर महामंत्री रवि गुरणुले, नगरसेवक राजेंद्र अडपेवार, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, राजु घरोटे, विनोद शेरकी, दिनकर सोमलकर, विठ्ठल डुकरे, सचिन कोतपल्लीवार, रवि लोणकर, वंदना संतोषवार, मोहन चैधरी, शाम कनकम, खुशबु चैधरी, सोपान वायकर, शशिकांत मस्के, राजेंद्र खांडेकर, वनिता डुकरे, संजय खनके, प्रमोद शास्त्रकार, पुनम तिवारी, राजेंद्र तिवारी, गौतम यादव, ललीत गुलानी, विकास खटी, राम हरणे, पराग मलोडे, तुषार मोहुर्ले, रामप्रवेश यादव, सुदामा यादव, जगदीश दंडेले, राहुल बोरकर, जितु शर्मा, मयंक अडपेवार यांचेसह शेकडो कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले.


भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने चार राज्यात विजय मिळवल्या बद्दल फटाके फोडून, पेढे वाटून, विजयाच्या घोषणा देऊन आनंद उत्साह साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने उत्तर प्रदेश, उत्तराखंड,गोवा,मनिपुरम भाजपा ला यश मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी कोरपना तालुका च्या वतीने श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आनंदोत्सव फटाके फोडून,पेढे वाटून, विजयाच्या घोषणा देऊन आनंद उत्साह साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,अमोल आसेकर, मेघराज हरबळे शशिकांत अडकिने, प्रदिप पिपंळशेडे विजय पानघाटे,विनोद नवले,पद्माकर दगडी,अभय डोह, अमोल टोंगे,गुलाब गेडाम पिसाराम गेडाम,उलमले बाबु,वासेकरजी आदि भाजपा तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भारतीय जनता पार्टी गोंडपीपरी तालुक्याच्या वतीने उत्तर प्रदेश, उत्तराखंड,गोवा,मनिपुरम राज्यात भाजपा ला यश मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी गोंडपीपरी शहर व तालुका च्या नेतृत्वात आनंदोत्सव फटाके फोडून,पेढे वाटून, विजयाच्या घोषणा देऊन आनंद उत्साह साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला बंडू भाऊ बोनगीरवार , बबन निकोडे, सुहास काका माडूरवार, चेतनसिंह गौर, गणपती चौधरी, साईनाथ माष्टे, नाना येलेवार,संजय झाडे ,अश्विन कुसनाके, प्रज्वल बोबाटे, वैभव बोनगीरवार, आनंदराव झाडे व भाजपा तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने भरघोस मतांनी विजयी मिळविल्याबद्दल भारतीय जनता पक्ष चंद्रपुर महानगर च्या वतीने गिरनार चौक येथे विजय उत्सव जल्लोष साजरा करण्यात येत आला. यावेळी भाजपाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




उत्तर प्रदेश,उत्तराखंड,गोवा,मणिपूर या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी विजयी झाल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन..
बल्लारपूर भाजप तर्फे विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.


भद्रावती:-  गुरुवारी लागलेल्या निकालात देशातील चार राज्यांत भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशाचा विजयी जल्लोष येथील भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून साजरा केला.
       पेट्रोल पंप चौक व गांधीं चौक येथे फटाके फोडण्यात आले. भद्रावती येथे चार राज्यात विजय मिळवल्याबद्दल विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत गुंडावार, किशोर गोवारदीपें, विजय वानखेडे, प्रशांत डाखरे, संजय वासेकर, सुनील नमोजवर, माधव बांगडे, केशव लांजेकर, गजानन कामातवार, गोपाल गोसावाडे, अनंता मांढरे, तोशीब शेख, उमेश शहा, पवन हुरकट, गोविंदा बिंजवे, गोपाल गोस्वाडे, रामकृष्ण मेंढे, विनोद उपगनलावार, संजय राय, विजय माथणकर, शत्रुघ्न पुल्लरवार, संजय निवलकर, शंकर कलणडी उपस्थित होते.