Top News

डॉ. रामराव महाराजांच्‍या विचारांचा अंगीकार हीच खरी आदरांजली:- आ. सुधीर मुनगंटीवार #Jivati


पाटण येथे डॉ. रामराव महाराज यांच्‍या पुर्णाकृती पुतळयांचे अनावरण
डॉ. रामराव महाराजांचे कर्तृत्‍व उत्‍तुंग होते. समाजातील उपेक्षित, वंचितांच्‍या कल्‍याणासाठी ते सतत झटले. त्‍यांनी दाखविलेला लोककल्‍याणाच्‍या मार्गावर मार्गक्रमण करणे हीच त्‍यांना खरी आदरांजली असल्‍याचे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक २८ मार्च २०२२ रोजी पाटण येथे डॉ. रामराव महाराज यांच्‍या पुर्णाकृती पुतळयाच्‍या अनावरण कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी या नात्‍याने दीक्षागुरू प्रेमसिंग महाराज, माजी केंद्रीय राज्‍यमंत्री श्री. हंसराज अहीर, माजी आ. संजय धोटे, माजी आ. सुदर्शन निमकर, भिमराव पाटील मडावी, गोदावरी केंद्रे, कमल राठोड, दत्‍ताजी राठोड, पांडूरंग जाधव, केशवराव गिरमाजी, सुरेश केंद्रे, वाघुजी गेडाम, महेश देवकते, विठ्ठल चव्‍हाण, हरीश झाडे, नामदेव जाधव, बंडूजी पवार आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, बंजारा समाजाचे आराध्‍य दैवत असलेल्‍या पोहरादेवी परिसराच्‍या विकासासाठी १०० कोटी रू. च्या प्रस्तावाला अर्थमंत्री म्‍हणून मान्यता देऊ शकलो यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. या विकासकार्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकलो हे माझे सौभाग्य आहे. त्‍या भागात उत्‍तम वनउद्यान व्‍हावे म्‍हणून निधी मंजूर केला. केळापूर येथील जगदंबा मंदीरासाठी ५ कोटी रू. निधी उपलब्‍ध केला. १८ जून २०१९ रोजी मांडलेल्‍या अर्थसंकल्‍पात तांडा व पाडयांच्‍या विकासांसाठी निधी उपलब्‍ध केला. या परिसरातील पट्टयांच्‍या प्रश्‍नासाठी राज्‍य व केंद्रांच्‍या मंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्‍न निकाली काढण्‍यासाठी सर्वतोपरी प्रयत्‍न करेन, असेही आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले. यावेळी माजी केंद्रीय राज्‍यमंत्री हंसराज अहीर, सुदर्शन निमकर, संजय धोटे, प्रेमसिंग महाराज आदींची भाषणे झालीत. कार्यक्रमाला बंजारा समाजबांधवांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने