Top News

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार मनामनापर्यंत पोहचवा:- आशिष ताजने #Korpana


तळोधी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त संत संग मेळाव्याचे आयोजन
कोरपना:- कोरपना तालुक्यातील तळोधी येथे गुरुदेव सेवा मंडळातर्फे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त संत संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र हा संत-महात्म्याच्या असून त्यांनी शिकविलेल्या मार्गावर आज समाजाची वाटचाल होत आहे.त्यांनी समाजात प्रबोधन करून दिशा देण्याचं कार्य त्यांनी त्यांच्या काळात केलं.त्यामुळेच समाजात एकोपा,सामाजिक बांधिलकी टिकून आहे.त्यांनी सर्व समाजातील वंचित शोषित घटकांकरिता कार्य केले असून,आपल्याला आदर्श समाजाची निर्मिती करायची झाल्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार समाजातील प्रत्येक मनुष्याच्या मनामनात विचार पोचवावे लागतील असे प्रतिपादन आशिष ताजने यांनी केले.

यावेळी मंचावर तळोधी ग्रामपंचायतच्या सरपंच ज्योतिताई जेनेकर,गुरुदेव सेवा मंडळाचे डॉ.अरविंद ठाकरे,देवराव ठावरी,पोलीस पाटील विठ्ठल पा.गोहोकर,तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव कुबडे,बाळा संकुलवार,दादा पा.गोखरे,मत्ते पाटील,बोंडे महाराज,कुसुमताई संकुलवार उपस्थित होते.
     
         तळोधी येथे २ दिवसीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त संत संग सोहळ्याचे आयोजन केले,यावेळी गावातून भजन फेरी काढण्यात आली. यावेळी मंचावरील अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
 या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रमेश गोखरे,वासुदेव डहाके,इंदूताई गोखरे,विमल कुबडे,कौसबाई गोहकर,ताराबाई गोखरे यांनी अथक परिश्रम केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गोरखनाथ लांडगे यांनी केले.
यावेळी गावातील महिला,पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने