पोंभुर्णा:- ॲटो चालक मालक संघटना तालुका पोंभूर्णा संघटनेकडून चिंतलधाबा येथे दि. ३० मार्चला सकाळी १०:३० वाजता रस्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी वाहतूक पुर्णपणे ठप्प राहणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे व कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे आक्सापूर चिंतलधाबा रोडचे काम रखडले आहे. रस्त्याची फार मोठी दुरावस्था झाली आहे. ॲटो, टु व्हीलर, चार चाकी वाहने चालविणे कठीण झाले आहे. सामान्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जीव मुठीत घेऊन या मार्गाने प्रवास करावा लागतो आहे. या मार्गाने प्रवास करताना जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.
वेळीच संबंधित विभागाने सज्ञान बाळगून आक्सापूर चिंतलधाबा रोडचे काम पुर्ण करण्याची मागणीही संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.