Top News

तनशीच्या ढिगाऱ्याला लागली आग #fire #firenews

गोंडपीपरी:- तालुक्यातील मौजा अडेगांव येथे अचानक तनसीला आग लागली या आगीत तनिस जळून खाक झाल्याची घटना आज दि. 29 मार्च रोज मंगळवारला घडली आहे.
तनसीच्या ढिगाऱ्याला आग लागल्याची बातमी गावात पसरताच घटनास्थळी गावकऱ्यांची गर्दी उसळली. घराजवळ तसेच लगतच्या शेतातील असलेल्या विहीरीतिल पाण्याने आग विझविण्याचा गावकऱ्यांनी प्रयत्न केला तब्बल चार ते पाच मोटार पंप एकाच वेळी सुरू करण्यात आले. विहिरी तिल पाणी कोणी बादली घेऊन तर कुणी गुंड, चरविणे, तर कुणी पाईपणे आग विझविण्याचा प्रर्यन्त केला.मात्र आग काही आटोक्यात येईना. तनसीचे ढिगारा गावालगत असल्याने व ढिगाऱ्याला आग लागल्याने गाववाशीयांची धावपळ सुरू झाली.आगीचा फडका होवून जवळपास असलेल्या घरांना आग लागल्यास मोठा अनर्थ घडला असता.
वेळीच  घटनेची माहिती जिल्ह्या परिषद सदस्या वैष्णवी अमर बोडलावार यांनी देण्यात आली असती त्यांनी पाण्याची टँकर  पाठवली. 
तसेच गोंडपीपरी पोलीस स्टेशनला याबाबत माहिती देण्यात आली. गोंडपीपरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी हजर झाले. बोडलावार यांनी पाठविलेल्या पाण्याच्या टँकर ने अखेर आग विझविण्यात आली.
तो पर्यंत अडेगाव येथिल शेतकरी शंकर नागापुरे आणि राऊजी पिपरे यांची तनिस जळून खाक झाली.त्यामुळे गुरांचे तनिस खाद्याचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

धान्य पीक निघाले की, शेतकरी गुरांच्या चाऱ्यां साठी गावालगत तनसीचे ढिगारे तयार करतात. आणि उन्हाळ्यापासून पावसाळ्या पर्यन्त गुरांचा चारा म्हणून तनिस खाद्य म्हणून जनावराणा देत असतात. अश्यातच गावा लगत असलेल्या तनसिला अचानक पणे आग लागल्याने व वेळीच गावकऱ्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविन्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.
मात्र गुरांचे खाद्य आगीत जळून खाक झाले.
मात्र आग कशी लागली याबाबत माहिती कळू शकली नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने