जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या वाहन ताफ्यात इलेक्ट्रिक वाहने तैनात करा #chandrapur


खासदार बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी यांच्याकडे नमस्ते चांदा बहुउद्देशीय संस्थेची मागणी

चंद्रपूर : स्वच्छ वाहतूक आणि नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने शासकीय, निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत फक्त इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे व भाड्याने घेण्याच्या निर्णय लागू करण्यात आला आहे. परंतु याची अमलबजावणी चंद्रपूर शहरात तातडीने लागू करण्याची मागणी नमस्ते चांदा बहुउद्देशीय संस्थेने खासदार बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून केला आहे.
  यावेळी हितेश कोटकर, सागर मसादे, रोशन कोंकटवार, महेश सोमनाथे, झंकार साखरकर, कमलेश चटप यांची उपस्थिती होती. 

महाराष्ट्रातील प्रदूषण कमी करणे आणि प्रदूषणविरहित वाहनांना प्रोत्साहन देण्याकरिता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे गरजेचे आहे. राज्यात सर्वाधिक प्रदूषण चंद्रपूर जिल्ह्यात आहे. परंतु एकही शासकीय, निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इलेक्ट्रिक वाहन तैनात केल्याचे निदर्शनास आले नाही. अनेक विभागात खासगी कंत्राटदाराकडून वाहने घेण्यात येतात. परंतु आता हे कंत्राट काढताना फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यासाठी पर्यावरणपूरक उपक्रम राबवित हे वाहन घेतले पाहिजे. तरच जिल्ह्यात प्रदूषण कमी होण्यास मदत होईल व माझी वसुंधरा सारख्या उपक्रमाला हातभार लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत