Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

कंपोस्ट खत घोटाळ्यात अनेक मासे अडकणार..! #Pombhurna

शिवसेना करणार पालकमंत्र्यांकडे चौकशी तथा कारवाईची मागणी

खरडे, रबर, धातू, काच, पाॅलिथीन इत्यादी साहित्यही गहाळ
पोंभूर्णा:- पोंभूर्णा शहरात सध्या चर्चेत असलेल्या कंपोस्ट खत घोटाळ्यात अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असुन नगराध्यक्षा सुलभा पिपरेचे पती गुरूदास पिपरे व्यतिरिक्त लाभार्थी कोण? ट्रॅक्टर कोणाची? कर्मचारी कोणते?नगरपंचायतचे वाहन वापरणारे चालक, घनकचरा व्यवस्थापन कामाचे ठेकेदार, दिपक लोचाराम उतराधी अमरावती, व त्याचे कामगार असे एक ना अनेक नावे चर्चेत येत असुन शहरात सार्वत्रिक चर्चेला उधाण आले आहे. तसेच उद्या पालकमंत्री विजय वडेट्टीवार शहरात येत असल्याने शिवसेना नगरसेवकांचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेऊन चौकशी व कार्यवाहीची मागणी करणार असल्याचेही समजते. या कंपोस्ट खतासोबत दैनंदिन संकलनात जमा होणारे खरडे, रबर, धातू, कपडे,काच प्लॅस्टीक, पाॅलिथीन अशा निरुपयोगी वस्तूही गहाळ असल्याने घनकचरा संकलन केंद्र आर्थिक घोटाळ्याचे कुरणच असल्याचे निदर्शनास येत आहे.
आमदार मुनगंटीवारांनी आपली स्वच्छ प्रतिमा आबाधित राखण्यासाठी काहीही करतात. तेंव्हाच ते वाघाची डरकाळी फोडल्याप्रमाणे बोलत असतात. परंतु पदभार ग्रहन करताच नवनियुक्त पदाधिकारी व त्यांचे नातेवाईक व विश्वासू सहकाऱ्याच्या माध्यमातून घडवून आलेला कंपोस्ट खत घोटाळा मुनगंटीवारांच्या प्रतिमेला डाग लावणाराच ठरत आहे. जनतेनी आमदाराच्या हाकेला ओ देत,मताचा जोगवा मागतांना उमेदवारांची पात्रता व क्षमता न पाहता सरसकट भाजपाला भरघोस सहकार्य केले. परंतु स्वपक्षातील विश्वासू सहकाऱ्यानी कंपोस्ट खत चोरी करून त्यांच्या प्रतिमेला ग्रहण लावण्याचे काम केले आहे.
घनकचरा अधिनियम १९६० ,नगरपंचायत अधिनियम १९६५ व नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारामध्ये झालेल्या करारनाम्यानुसार घनकचरा प्रकल्पावरील कोणतेही साहित्य नगरपंचायतच्या पूर्व परवानगी शिवाय विकणे किंवा इतरत्र हलविणे किंवा पदाधिकारी मार्फत स्वताच्या हिताकरिता वापर करणे हा गुन्हा ठरत असुन ,अनुभवहिनता, स्वार्थी मोहापायी झालेला हा प्रकार अत्यंत वेगळे वळण घेण्याची शक्यता असुन,निष्पक्ष चौकशी झाल्यास घनकचऱ्यातून आर्थिक लाभ घेणारे चेहरे उघडे पडण्याची शक्यता असुन ,त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना गटनेता आशिष कावटवार,सहकारी नगरसेवकांचे शिष्टमंडळ लावून धरण्याची दाट शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत