Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

मधमाशांनी घेतलं; जीव वाचवण्यासाठी तरुणाची थेट कालव्यात उडी अन्.... #Death #Bees

भंडारा:- भंडारा जिल्ह्यातून एक वेदनादायी बातमी समोर आली आहे. एका 25 वर्षीय तरुणावर मधमाशांनी हल्ला केला. या मधमाशांच्या हल्ल्यापासून जीव वाचावा यासाठी तरुणाने कालव्यात उडी मारली. पण तरीही अनपेक्षित आणि वाईट घटना घडली. कालव्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याच्या निधनामुळे त्याचं कुटुंब, नातेवाईक आणि मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृतक तरुण हा त्याच्या चारचाकी वाहनाने शेतात जात होता.
यावेळी अचानक मधमाशांनी त्याच्यावर हल्ला केला. यावेळी जीव वाचवण्यासाठी या तरुणाने कालव्यात उडी मारली. पण पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. संबंधित घटना ही भंडारा जिल्ह्यातील पवनी या शहरात घडली आहे.
या दुर्घटनेत 25 वर्षीय महेश रेवतकर या तरुणाचा मृत्यू झाला आहे. महेश रेवतकर हा युवक घरुन शेतावर जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान अचानक त्याच्यावर मधमाशांनी हल्ला चढवल्याने तो सैरावैरा झाला आणि स्वतःला बचावण्यासाठी वाहात असलेल्या गोसे धरणाच्या उजव्या कालव्यात उडी घेतली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्याला कालव्याच्या बाहेर निघता आले नाही.
🌄
त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचा कालव्यात मृतदेह सापडल्यामुळे ही घटना उघडकीस आली. संबंधित घटना वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी एकच गर्दी घटनास्थळी दाखल झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पवनी येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पवनी पोलीस करीत आहे. मात्र या घटनेमुळे रेवतकर कुटुंबावर दुःखाचे संकट कोसळले आहे. या घटनेमुळे पवनी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत