Top News

शिवसेनेचे आरोप बिनबुडाचे व जनतेची दिशाभूल करणारे आहेत:- गुरूदास पिपरे #pombhurna

पोंभूर्णा:- नगरपंचायत पोंभूर्णा येथील कंपोस्ट खताच्या बाबतीत शिवसेनेने केलेले आरोप हे बिनबुडाचे असुन पोंभूर्ण्यातील जनतेची दिशाभूल करणारे आहेत. दिनांक १० मार्च २०२२ रोजी शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा नगरपंचायत पोंभूर्णाचे विरोधी पक्ष गटनेते आशिष कावटवार व इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझेवर कंपोस्ट खताच्या बाबतीत खोटा आरोप लावलेला आहे. सदर प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. आमच्या मालकीची शेतजमीन ही दहा वर्षाकरीता पोंभूर्णा येथील रवि वासेकर या शेतकऱ्याला ठेक्याणे दिलेली आहे. रवि वासेकर व इतर काही शेतकऱ्यांनी कोणत्या अधिकारी व कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून खताची उचल केली, हे सुध्दा मला माहित नाही. आणि शेती ठेक्याणे दिलेली असल्याने आम्ही आमच्या शेतात खत टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
परंतु शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर माझी व पोंभूर्ण्याच्या नगराध्यक्षा माझी पत्नी सुलभा पिपरे आम्हां दोघांची बदनामी करून राजकीय कारकीर्द खराब करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच साठी हे बिनबुडाचे आरोप लावलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेनी केलेले आरोप हे बिनबुडाचे व निषेधार्ह आहे. त्याच प्रमाणे पोंभूर्णा येथील नागरीकांचा अपमान करणारे आहे. विरोधी पक्ष गटनेते आशिष कावटवार हे चिंधीचा साप बनविण्यात माहीर आहेत. शिवसेनेने केलेल्या आरोपाच्या बाबतीत समंधीत अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.
महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय आमदार सुधिर मुनगंटीवार यांनी आमच्यावर विश्वास ठेवून माझ्या पत्नीला नगराध्यक्षा पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी या पक्षाची बदनामी होईल असे कोणतेही कृत्य आमच्या हातून होणार नाही, अशी हमीच गुरदास पिपरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने